मद्रास हायकोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशाची सुनेला मारहाण, व्हिडीओ व्हायरल

1021

मद्रास हायकोर्टाचे निवृत्त न्यायाधीश नूटी राममोहन राव यांनी त्यांच्या सुनेला मारहाण करत तिचा छळ केल्याचे समोर आले आहे. त्या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओत राव व त्यांचा मुलगा सून सिंधू शर्माला मारहाण करताना दिसत आहेत. याप्रकरणी सिंधू हिने 27 एप्रिल 2019 रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आता या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्याने सिंधूची बाजू अधिक मजबूत झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या