मदरशातील लैंगिक शोषणाची बळी असलेल्या तरुणीला जिवंत जाळलं, 16 जणांना फाशीची शिक्षा

1711

तरुणीला जिवंत जाळणाऱ्या 16 गुन्हेगारांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या तरुणीने मदरशात तिचं लैंगिक शोषण झाल्याची तक्रार तिने केली होती. त्यामुळे तिला जिवंत जाळण्यात आलं होतं.

हे प्रकरण बांगलादेशमधील असून या प्रकरणानंतर मदरशांमध्ये होणाऱ्या लैंगिक शोषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एप्रिल 2019मध्ये घडलेल्या या प्रकरणाने बांगलादेश हादरला होता. 19 वर्षांच्या नुसरत जहां रफी या तरुणीने ती शिकत असलेल्या सोनागाछी सिनिअर फजील मदरसा या संस्थेतील प्राचार्य सिराज उद्दौला याच्या विरोधात लैंगिक शोषणाची तक्रार केली होती. पोलिसांनी सिराज याला अटक केल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी तक्रार मागे घेण्यासाठी नुसरतच्या कुटुंबावर दबाव आणाला होता. पण, नुसरत त्याला बधली नाही. म्हणून सिराजने सूड भावनेने मदरशातील काही कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना तिला ठार मारण्याचे आदेश दिले होते.

नुसरतला जाळण्यात आलं त्या दिवशी तिची परीक्षा होती. तिच्या वर्गमित्राने बहाण्याने तिला मदरशाच्या छतावरील गच्चीत आणलं. तिथे उपस्थित अन्य काही विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी तिचे हात पाय बांधले आणि तिला पेटवून दिलं. तिने आत्महत्या केली असा भास निर्माण करण्याचा त्यांचा हेतू होता. पण, आगीमुळे नुसरतच्या पायावरील दोरी सुटली आणि तिने तोंडावरचा बोळा काढून मदतीसाठी ओरडा केला. 80 टक्के भाजलेल्या नुसरतला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जिथे तिचा पाच दिवसांनी मृत्यू झाला. तिच्या भावाने तिची मृत्युपूर्व जबानी रुग्णवाहिकेत असतानाच मोबाईलमध्ये रेकॉर्ड केली होती.

या प्रकरणाची सुनावणी तेथील न्यायालयात करण्यात आली. तेव्हा न्यायाधीशांनी हे प्रकरण गंभीर असल्याचं म्हटलं. अशा प्रकारे गुन्हेगारांना मोकाट सोडल्यास कायद्याचं राज्य राहणार नाही, असं नमूद करत न्यायालयाने या प्रकरणातील 16 गुन्हेगारांना फाशीची शिक्षा सुनावली. कोणत्याही देशाच्या इतिहासात असं प्रथमच घडत असून इतक्या गुन्हेगारांना

 

आपली प्रतिक्रिया द्या