टिट टॉक पुन्हा डाऊनलोड करता येणार, कोर्टाने बंदी उठवली

tiktok-f

सामना ऑनलाईन । चेन्नई

हिंदुस्थानमध्ये टिक टॉक हे अॅप अत्यंत लोकप्रिय झाले होते. परंतु या अॅपमुळे अश्लील व्हिडीओ पसरवले जात असल्याच्या तक्रारी दाखल करण्यात आल्यानंतर या अॅपवर बंदी घालण्यात आली होती. मात्र मद्रास हायकोर्टाच्या मदुराई खंडपीठाने टिकटॉक व्हिडीओ अॅपवरील बंदी उठवली आहे. सर्वोच्च न्यायालयाने मद्रास उच्च न्यायालयाला 24 एप्रिल पर्यंत यावर निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आज हा आदेश देण्यात आला. त्यामुळे टिक टॉक आता पुन्हा डाऊनलोड करता येणार आहे.

मद्रास उच्च न्यायालयाने टिक टॉकवर बंदी आणली होती. त्यानंतर टिक टॉक कंपनीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला. असे असले तरी मद्रास उच्च न्यायालयाला 24 एप्रिल पर्यंत पुन्हा विचार करण्यास सांगितले. तसेच 24 एप्रिल पर्यंत निर्णय न दिल्यास आपोआप बंदी उठवली जाईल, असे देखील स्पष्ट केले होते. अखेर आज मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने टिक टॉकअॅप वरील बंदी उठवली.