या कुत्र्यावर तस्करांनी लावले ५० लाखाचे इनाम

73

सामना ऑनलाईन। कोलंबिया

अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी ओळखल्या जाणाऱ्या कोलंबियातील ड्रग्ज माफियांची सध्या झोप उडाली आहे. ही झोप कुणा पोलीस अधिकारी किंवा बड्या माफियाने उडवली नसून एका कुत्र्याने उडवली आहे. कोलंबिया पोलीस विभागाचा हा कुत्रा असून सोंब्रा असे त्याचे नाव आहे. गेल्या दोन वर्षात त्याने ६८ कोटी रुपयांचे ड्रग्ज पकडून दिले आहे. यामुळे माफियांच्या जगतात खळबळ उडाली आहे. यामुळे संतप्त माफियांनी सोंब्राला जिवंत वा मृत पकडून देणाऱ्यास ५० लाख रुपयाचे इनाम जाहीर केले आहे.

कोलंबिया पोलिसांनी सोंब्राबाबत टि्वटरवर ही माहिती दिली आहे. जर्मन शेफर्ड असलेला सहा वर्षाचा सोंब्रा पोलीस खात्यातील सगळ्यांच्याच गळ्यातील ताईत आहे. भेदक नजर, अंगात असलेली वीजेची चपळाई ही त्याची वैशिष्ट्य आहेत. दोन वर्षापूर्वीच त्याचा पोलीस खात्यात समावेश झाला आहे. सुरूवातीला तो विमानतळावर काम करायचा. मार्च २०१६ मध्ये त्याने प्रवाशाच्या बँगमधले २९५८ किलो कोकीन शोधून काढले होते. त्यानंतर २०१७ साली त्याने बेल्जियमला पाठवण्यात येणारे १.१ टन कोकीन शोधले होते. त्यानंतर त्याने ५.३ टन कोकीन शोधून काढले. यावेळी केलेल्या कारवाईत २४५ जणांना अटक करण्यात आली आहे. हे सर्व आरोपी सोंब्राचे शत्रू झाले आहेत. यामुळे सोंब्राच्या सुरक्षितेत वाढ करण्यात आली आहे. सोंब्रा बुलेटप्रूफ गाडीतून प्रवास करतो. त्याच्या सुरक्षेसाठी दोन सशस्त्र पोलीस सतत त्याच्याबरोबर असतात. विमानतळावर तो फक्त ६ तास काम करतो.

summery…drugs mafia of kolmbia announce 50 lakhe rupees award on sniffer dog sobra

आपली प्रतिक्रिया द्या