रुग्णांच्या जेवणात अळया, उपजिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकाराने खळबळ

671

हिंगोली जिल्हायातील कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना देण्यात येणाऱ्या जेवणामध्ये अळया निघाल्या. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या महिलांना दोन्ही वेळेस जेवण दिले जाते. शनिवारी संध्याकाळी आठ ते दहा रुग्णांना वरण-भात देण्यात आला. तीन ते चार रुग्णांनी एक-दोन घास जेवण केल्यानंतर वरणात अळ्या असल्याचे आढळून आले. रुग्णांच्या नातेवाईकांनी ही बाब वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कानावर टाकली व वरणातील आळ्या ही दाखविल्या. या प्रकारानंतर रुग्णालयात एकच खळबळ उडाली असून जेवण पुरविणाऱ्या कंत्राटदाराला रुग्णांच्या नातेवाईकांनी चांगलेच धारेवर धरले. त्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. कंत्राटदाराचा जेवणाचा पुरवठा बंद करण्याचे आदेश मिळताच परिस्थिती निवळली. या घटनेने जिल्हातील सर्व सरकारी दवाखान्यात पुरविण्यात येत असलेल्या जेवणाची तपासणी करण्याची मागणी रूग्णांच्या नातेवाईक यांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या