कुंभारमाठ येथे माघी गणेश जयंती उत्सव

156

सामना ऑनलाईन, मालवण

मालवण वायरी येथील श्री रेकोबा मित्रमंडळाच्या वतीने कुंभारमाठ येथील शासकीय तंत्रनिकेतन शेजारी असलेल्या सिद्धीविनायक पटांगण येथे माघी गणेश जयंती उत्सवानिमित्त ३० जानेवारी ते ४ फेब्रुवारी या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

संजय लुडबे यांच्या संकल्पनेतुन  गेली अनेक वर्ष  माघी गणेश जयंती उत्सव होत आहे. यात ३० जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता धार्मिक विधी,सायंकाळी ४ वाजता मालवण शहरातून मिरवणुकीने गणेश मुर्तीचे आगमन यात केळुसकर बंधू म्हापण यांचे आकर्षक नृत्य, ३१ रोजी सकाळी ९ वाजता गणेशमूर्ती पूजन, दुपारी १२ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ६ वाजता महाआरती, रात्रौ ९ वाजता दुर्वांकुर कला क्रीडा ग्रुप म्हापण प्रस्तुत रंगात १ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता आरती, सायंकाळी ४ वाजता भजन, रात्रौ ८ वाजता भैरवी जोगेश्वरी फुगडी ग्रुप यांची फुगडी, रात्रौ १० वाजता बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग,होणार आहे.२ रोजी सकाळी ७ वाजता महाआरती, सकाळी १० वाजता रक्तदान शिबीर, ७ वाजता भजन,  रात्री ८ वाजता भव्य  रेकॉर्ड डान्स स्पर्धा मोठा व लहान अशा दोन गटात होणार आहे. विजेत्यांना आकर्षक रोख  पारितोषिक ठेवण्यात आली आहेत.

३ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता आरती, सकाळी १० वाजता सत्यनारायणाची महापूजा, व तीर्थप्रसाद, सायंकाळी ४ वाजता हळदी कुंकू,सायंकाळी ७ वाजता आरती,रात्रौ ८ वाजता जंगी तिरंगी भजनबारीचा सामना बुवा गुंडू सावंत,बुवा श्रीकांत शिरसाट, बुवा राहुल कुलकर्णी यांच्यात होणार आहे. ४ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता, महाआरती, दुपारी १२ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ४ वाजता श्री गणेश विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे. भाविकांनी या  धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन संजय लुडबे, जिल्हा परिषद सदस्य संजीवनी लुडबे, मंदार लुडबे व रेकोबा मित्रमंडळ वायरी  यांनी केले आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या