बॉलीवूड पार्कची जादू; मालदीवच्या अध्यक्षांनी दिली चित्रनगरीला भेट 

मालदीव प्रजासत्ताकचे अध्यक्ष इब्राहिम मोहमद सोलिह यांच्यासह शिष्टमंडळाने गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीला नुकतीच भेट दिली. चित्रनगरीतील बॉलीवूड पार्क, क्रोमा स्टुडिओ पाहून मालदीवचे पाहुणे  प्रभावित झाले.

बॉलीवूड पार्कमध्ये मराठी, हिंदी आणि मालदीव भाषेतील नृत्याबरोबर कॉमेडी शो आयोजित करण्यात आला होता. क्रोमा स्टुडिओमध्ये चित्रीकरणापूर्वी आणि नंतर कसे बदल, इफेक्ट्स केले जातात याचे प्रात्यक्षिक यावेळी दाखविण्यात आले. या शिष्टमंडळाने ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेच्या सेटला भेट दिली.

मालदीवच्या अध्यक्षांसह शिष्टमंडळात मालदीवचे वित्तमंत्री इब्राहिम अमीर, आर्थिक विकास मंत्री फैयाज इस्माईल, हिंदूस्थानचे उच्चायुक्त मुनू महावार यांचा समावेश होता. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विवेक भीमनवार यांनी त्यांचे स्वागत केले.