‘महाजनादेश यात्रे’चा समारोप,पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिकमध्ये

476

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘महाजनादेश यात्रे’च्या समारोपानिमित्त नाशिकच्या तपोवनातील स्वर्गीय पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी मैदानावर गुरुवारी, 19 सप्टेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाच्या वतीने सभास्थळी जय्यत तयारी करण्यात आली असून, कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पंचवटीतील तपोवन येथील वीस एकर मैदानाला स्वर्गीय पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात आले आहे. या सभास्थळी भव्य व्यासपीठ आणि 12 वॉटरप्रुफ मंडप उभारण्यात आले असून, 50 एलईडी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या समारोपानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा maha janadeshगुरुवारी सकाळी 11.30 वाजता होणार आहे. सुमारे तीन लाख जनसमुदाय येथे उपस्थित राहणार आहे. सभेच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपासून विशेष सुरक्षा दल या परिसरात तळ ठोकून आहे. कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमुळे या परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या