साहेबांचे निर्णय मान्य करा व स्वगृही परत यावं! रोहित पवारांचे अजितदादांना आवाहन

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करून भाजप सरकारला पाठिंबा देऊन उपमुख्यमंत्री झालेल्या अजित पवार यांच्या मनधरणीचे प्रयत्न राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून आणि पवार कुटुंबीयांकडून सुरू आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी साहेबांचे निर्णय मान्य करा व स्वगृही परत या, असे आवाहन अजित पवार यांना केले आहे. एकामागोमाग एक ट्वीट करत रोहित पवार यांनी अजितदादांना साद घातली आहे.

उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवारांचे पहिले ट्वीट, बंड मागे न घेण्याचे संकेत?

रोहित पवार आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात, लहानपणापासून साहेबांना (शरद पवार) पाहात आलो, प्रश्न राजकीय असो की कौंटुबिक, साहेब कधी खचून जात नाहीत. माझे आजोबा अप्पासाहेब पवार गेल्यानंतर वडील राजेंद्र दादांना धीर देणारे साहेब मी पाहिले आहेत आणि अजितदादांचे वडील अनंतराव पवार गेल्यानंतर अजितदादांना सावरणारे देखील साहेबच होते. अजितदादांच्या वडिलांच्या पश्चात दादांच्या लहानपणापासून त्यांना वडिलांचे प्रेम देणारे साहेबच होते. तसेच आदरणीय पवार साहेबांवर अडचण आल्यानंतर खंबीर भूमीका घेणारे अजितदादा देखील आपण पाहिले आहेत. प्रश्न कौटुंबिक असो की राजकिय खचून जाणं हे साहेबांच्या डिक्शनरीत नाही. आजच्या घडामोडी पाहताना जूने चित्र कायम तसेच असावे. अजितदादांनी साहेबांचे निर्णय मान्य करावेत व स्वगृही परत यावं असे मनापासून वाटते. साहेब राजकारण आणि कुटुंब कधीच एकत्र करत नाहीत व ते करणार देखील नाहीत, पण कुठेतरी सर्वसामान्य घरातून एक व्यक्ती “पवार साहेब” होतो, असे ट्वीट रोहित पवार यांनी केले.

rohit

ते पुढे म्हणतात, ‘सर्वसामान्यांच्या आवाज होतो व अखेरपर्यंत लढत राहतो तेव्हा या देशातल्या अहंकारी शक्ती तो आवाज दाबू पहात आहेत अशावेळी कुटूंबाचा घटक म्हणून व्यक्तिशः मला वाटतं की आपण सर्वांनी साहेबांच्या सोबत राहायला हवे. लवकरच महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येईल पण यात हक्काची माणसं दूरावू नयेत.’

https://www.saamana.com/maha-political-twist-shiv-sena-uddhav-thackeray-ncp-sharad-pawar-lalit-hotel-update/

आपली प्रतिक्रिया द्या