महायुती सरकारने मंत्रिमंडळात धडाधड निर्णय घेतले पण त्यातील किती निर्णयांची अंमलबजावणी होईल. महाराष्ट्राच्या प्रशासनाचा देशात लौकिक होता पण महायुती सरकराच्या काळात ही प्रशासकीय व्यवस्था उद्ध्वस्थ झाली आहे, त्याची महाराष्ट्राला मोठी किंमत मोजावी लागत आहे. प्रशासन व्यवस्था उद्ध्वस्त करणाऱ्यांच्या हातून महाराष्ट्र वाचवावे लागेल आणि त्यासाठी महाविकास आघाडी प्रयत्न करत आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणआले.
काँग्रेसने बंजारा समाजाला काहीच दिले नाही या आरोपाचा समाचार घेत शरद पवार म्हणाले की, काँग्रेसने बंजारा समाजाला राज्याचे नेतृत्व करण्याची दोनदा संधी दिली. वसंतराव नाईक यांना 11 वर्षे मुख्यमंत्रीपद दिले तर सुधाकर नाईक यांनाही मुख्यमंत्री केले. नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा राखली पाहिजे असेही पवार म्हणाले.
महाराष्ट्र ही मोदी-शहांच्या गुलामांची वसाहत झालीय, सरकार घालवावंच लागेल; उद्धव ठाकरे यांचा निर्धार
हरियाणाच्या निकालावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्रातील जनता राज्यात बदल करण्यासाठी उत्सुक आहे. लोकसभा निवडणुकीवेळीही तसेच चित्र होते. मविआने 48 पैकी 31 जागा जिंकल्या आणि विधानसभेलाही तसेच परिणाम येतील असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.
गुजरातधार्जिणे सरकार हद्दपार करून महाराष्ट्र वाचवणे हेच मविआचे लक्ष्य! – नाना पटोले
दोन दिवसात आचारसंहिता आणि निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल. मी सातत्याने महाराष्ट्रात हिंडतोत, सहकारीही फिरताहेत. माझे निरीक्षण असे आहे की महाराष्ट्राची जनता परिवर्तनासाठी उत्सुक आहे. लोकांना बदल हवा होता लोकसभेवेळी स्पष्ट झाले. त्याची पुनरावृत्ती विधानसभेत होईल याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही, असेही पवार यावेळी म्हणाले.
महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदाच्या प्रश्नावर उत्तर देताना मविआच्या नेत्यांनी, मविआत नेतृत्वाच्या प्रश्न नाही व खुर्चीसाठी वादही नाहीत, आमच्यात एकमत आहे. ही निवडणूक मविआ विरुदध महायुती अशी आहे. महायुतीने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केल्यानंतर पाहू, असे स्पष्ट केले.