राज्यात होऊ घातलेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी महाविकास आघाडी सज्ज झाली असून आघाडीच्या प्रमुख नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद मुंबईत ‘हॉटेल ताज लँडस् एन्ड’ येथे होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यामध्ये संबोधित करणार आहेत. राजकीदृष्ट्या अत्यंत महत्वाच्या अशा या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.