वृद्धाश्रमात हलाखीचे जीवन जगतायत महाभारतातले ‘इंद्रदेव’

3766

बीआर चोप्रा यांच्या महाभारत मालिकेत इंद्र देवाची भुमिका साकारणारे अभिनेता सतीश कौल हे सध्या हलाखीचे जीवन जगत आहेत. सतीश हे एकेकाळी इंडस्ट्रीमधले कोट्यधीश होते. मात्र आता त्यांच्याकडील सर्व पैसा संपला असून ते वृद्धाश्रमात राहत आहेत.

80 च्या दशकात सतीश कौल हे पंजाबमधील चित्रपट व मालिकांमधील मोठा चेहरा होते. त्यानंतर त्यांना हिंदीतील महाभारतात भुमिका मिळाली. तसेच त्यांनी रामानंद सागर यांच्या विक्रम व वेताळमध्येही काम केले आहे. कर्मा, प्यार तो होना ही था, आंटी नंबर 1, प्यार का मंदिर अशा बॉलिवूड चित्रपटांमध्येही भुमिका केल्या आहेत. सतीश कौल यांच्याकडे त्या काळी कोट्यवधींची संपत्ती होती. मात्र अभिनयावरील प्रेमाखातर त्यांनी एक अभिनयाची अकादमी सुरू करायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी त्यांचे सर्व पैसे त्यात ओतले. मात्र त्यांची ही अॅकॅडमी चालली नाही. यात कौल यांना मोठं नुकसान झालं. त्यानंतर कौल यांचा मुलगा व पत्नी त्यांना सोडून अमेरिकेला निघून गेले. तेव्हापासून ते एकटे राहत आहेत. सध्या त्यांच्याकडे त्यांच्या औषध पाण्याला देखील पैसे नाहीत.

आपली प्रतिक्रिया द्या