मुंबईतल्या घराचं स्वप्न गणपती बाप्पा पूर्ण करणार!

12

सामना ऑनलाईन, मुंबई

मुंबईत घर असावं यासाठी चातका सारखी म्हाडाच्या लॉटरीची वाट पाहणाऱ्यांना यंदा गणपती बाप्पा पावणार आहे. कारण गणेशोत्सवाच्या आसपास म्हणजे ऑगस्टअखेरीला किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत परवडणाऱ्या घरांची लॉटरी निघणार आहे. सुमारे ८०० घरांची ही लॉटरी असेल. म्हाडाची लॉटरी शक्यतो ३१ मेपर्यंत निघते. मात्र, यावेळी खूपच उशीर झाल्यामुळे ही लॉटरी निघणार नाही, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु आता ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये ही लॉटरी निघणार आहे.

गोरेगाव, सायन, मानखुर्द आणि मुलुंड येथे ही घरे असतील. सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यावर यादी जाहीर केली जाईल. सर्वसामान्यांना मुंबईत घर घेणे शक्य होत नाही. मात्र, म्हाडाच्या माध्यमातून परवडणारी घरे मिळत असल्यामुळे सगळय़ांचे म्हाडाच्या लॉटरीकडे लक्ष असते. घरांची संख्या यावेळी कमी असल्यामुळे भाग्यवानांचेच नशीब फळफळणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या