कल्याणच्या आधारवाडी जेलमधून २ कैदी फरार

19
सामना ऑनलाईन । कल्याण
ठाणे जिल्ह्यातील कल्याणमधील आधारवाडी जेलमधून रविवारी सकाळी ७ वाजता दोन कैदी फरार झाल्यानं एकच खळबळ माजली आहे. दाविंद देंवेद्रन आणि मणिकंदन नादर असं या दोन कैद्यांची नावं आहेत.  जेलची भिंत पार करतानाचा सगळा प्रकार जेलमध्ये लावलेल्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे, मात्र कैदी फरार झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही गंभीर गुन्ह्यांच्या अंतर्गत शिक्षा भोगत होते. देवेंद्रनला लुटमार, दरोडा, मारहाण या गुन्ह्यांतर्गत पोलिसांनी अटक केली होती. तर नादरला हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक केली होती. या अट्टल गुन्हेगारांनी पळ काढल्याने पोलिसांचे धाबे दणाणले आहे. पोलीस आणि सीबीआय दोघांचाही कसून शोध घेत आहे.
आपली प्रतिक्रिया द्या