महाराष्ट्रातील 57 पोलिसांचा राष्ट्रपती पदक पुरस्काराने सन्मान

पोलिसांसाठी महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या राष्ट्रपती पदकांची घोषणा करण्यात आली आहे. या महत्त्वाच्या पदकांची घोषणा प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील 57 पोलिसांनी ह्या राष्ट्रपती पोलीस पदकांवर मोहोर उमटवली आहे.

ठाणे क्राईम बँचचे सहाय्यक पोलीस आयुक्त निवृत्ती कदम यांनाही राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. कदम यांना त्यांच्या आजवरच्या सेवाकाळात दुसऱ्यांदा या पदकाचा मान मिळाला आहे. कदम यांनी अ‍ॅक्शन प्लॅन बनवून ठाण्यातील गुन्हेगारीचा बिमोड करण्यात यश मिळवले. 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील दहशतवाद्यांचे पाकिस्तान कनेक्शन कदम यांनी उघड केले. त्यामुळे पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर उघडा पडला. चेकमेट वंâपनीवर पडलेल्या अकरा कोटीच्या दरोड्यात कदम यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या तपासात अवघ्या 48 तासात आरोपी गजाआड होऊन संपूर्ण रोकड हस्तगत करण्यात आली. 150 वाँटेड गुन्हेगारांना तुरुंगात पाठवले. नागपाड्यात हसिना पारकरच्या घरात लपून बसलेल्या अंडरवल्र्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्बाल कासकर याच्यासह सुरेश पुजारी टोळीच्या हस्तकांच्या कदम यांनी मुसक्या आवळल्या. खंडणीखोरांवर धडक कारवाई करून त्यांना चाप लावला. हल्ले आणि गोळीबार प्रकरणातील गुन्हेगारांना मोक्का लावून त्यांना गजाआड केले. पुण्यातील कॉसमॉस बँकेवर हॅकर्सनी घातलेल्या 94 कोटीच्या दरोड्यात देशाबाहेरील हॅकर्सनाही अटक करण्यात ते यशस्वी ठरले.

लेडी सिंघम संगीता अल्फान्सो

अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणाच्या पहिल्या तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता अल्फान्सो यांनाही राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. या हत्याकांडातील आरोपी अभय कुरुंदकर हा पोलीस अधिकारी असल्यामुळे तपासात अनेक अडचणी आल्या होत्या. मात्र अल्फान्सो यांनी न डगमगता केलेल्या तपासामुळे कुरुंदकरच्या मुसक्या आवळल्या गेल्या. त्यामुळे पोलीस दलात त्यांना लेडी सिंघम म्हणून ओळखले जाते. अश्विनी यांच्या नातेवाईकांनी केलेल्या मागणीनुसार सरकारने या हत्याकांडातील तपास पथकात त्यांचा समावेश कामय ठेवला आहे.

रविंद्र दौंडकर

पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची निवड राष्ट्रपती पदकासाठी करण्यात आली आहे. वाशी पोलीस ठाण्यात कार्यरत असताना दौंडकर यांनी अनेक गंभीर गुन्ह्यांच उकल केली आहे. गुणवत्तापुर्वक सेवेसाठी त्यांचा हा सन्मान करण्यात येणार आहे.

प्रवीणकुमार पाटील

नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रवीणकुमार पाटील यांना राष्ट्रपदी पदक जाहीर झाले आहे. पाटील यांनी नवी मुंबईचा पदभार स्विकारल्यानंतर कार चोरांचे अंतरराज्य रॅकेट उध्दवस्त करून मोठ्या प्रमाणात चारचाकी हस्तगत केल्या आहेत. पाटील हे 1996 साली पोलीस उपअधिक्षक म्हणून पोलीस दलात रुजू झाले होते. त्यांनी पुणे जिल्ह्यात वाळु माफियांवर धडक कारवाई केली होती. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेतही त्यांनी पोलीस उपायुक्त म्हणून जबाबदारी संभाळली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या