926 पोलिसांना राष्ट्रपती पदके जाहीर, महाराष्ट्रातील 58 पोलिसांचा गौरव

814

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून देशातील 926 पोलिसांना शुक्रवारी राष्ट्रपती पोलीस पदके जाहिर करण्यात आले. पोलीस दलात केलेल्या शौर्य, उल्लेखनीय आणि गुणवत्तापूर्वक कामगिरीबद्दल महाराष्ट्रातील 58 पोलिसांचा गौरव करण्यात आला आहे. त्यात पोलीस अधिक्षक विनायक देशमुख, वरिष्ठ निरीक्षक शालिनी शर्मा, सुर्यकांत बांगर, संजय धुमाळ, पोलीस निरीक्षक केदारी पवार यांचा समावेश आहे.

केंद्रीय गृह विभागाकडून पोलीस दलात शौर्य, उल्लेखनीय, गुणवतापूर्वक कामगिरी करणार्‍या देशभरातील 946 पोलीस अधिकारी-कर्मचार्‍यांची यादी आज जाहीर करण्यात आली. त्यातील 14 पोलिसांना शौर्याबद्दल, पाच पोलिसांना उत्कृष्ट सेवेकरीता राष्ट्रपती पोलीस पदक तर 39 पोलिसांना गुणवतापूर्वक सेवेकरीता पोलीस पदक जाहिर झाले आहे. राज्यातील अपर पोलीस महासंचालक रितेश मुनी कुमार, संजीव कुमार सिंघल, उपअधिक्षक सुषमा चव्हाण, उपनिरीक्षक विजय लोंढे आणि सहाय्यक उपनिरीक्षक गणेश मेहतरास या पाच पोलीस अधिकारी, कर्मचार्‍यांना उल्लेखनीय कामगिरीसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहिर झाले आहे.

दरम्यान, गुणवतापुर्वक कामगिरीसाठी राज्यातील 39 अधिकारी, कर्मचार्‍यांना गौरविण्यात आले असून त्यात पोलीस अधिकक्षक विनायक देशमुख, उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, तुषार दोषी, नरेंद्रकुमार गायकवाड, पोलीस निरीक्षक सुर्यकांत बांगर, प्रतिभा जोशी, संजय धुमाळ, केदारी पवार, सुनिल धनावडे, अशोक राजपूत, विनय घोरपडे, शालिनी शर्मा, उपनिरीक्षक विलास पेंडूरकर, सहाय्यक उपनिरीक्षक विश्वास भोसले आदि अधिकारी व कर्मचार्‍यांचा समावेश आहे.

शौर्य पदकाने सन्मानित

शौर्य गाजवणार्‍या अधिकार्‍यांमध्ये महाराष्ट्रातील उपनिरीक्षक राजेश खांडवे, तसेच मनिष गोरले, गोवर्धन वधाई,कैलास उसेंडी, कुमारशहा किरांगे, शिवलाल हिडको, सुरेश कोवासे, रतिराम पोरेती, प्रदीपकुमार गेडाम, राकेश नरोटे, राकेश हिचामी, वसंत तडवी, सुभाष उसेंडी आणि रमेश कोमिरे यांचा समावेश आहे.

पोलीस अधिक्षक- सुरेशकुमार मेंगडे, विक्रम  देशमाने, दिलीप बोरसटे, एसीपी- नेताजी भोपळे, किरण पाटील, अविनाश धर्माधिकारी, गोपिका जहागीरदार, मंदार धर्माधिकारी, मुकुंद हातोटे वरिष्ठ पोलीस निरीक्षक- राजेंद्र  कदम, सय्यद साबीरअली, सतीश गायकवाड, बालाजी सोनटक्के, प्रकाश कदम, सहायक पोलीस निरीक्षक- रवीद्र बाबर, अब्दुल रौफ गणी शेख, पोलीस उपनिरीक्षक-  रमेश खंडागळे, किशोर यादव, राजेंद्र पोळ,  नानासाहेब मसाळ, रघुनाथ भरसट, सहायक पोलीस उपनिरीक्षक- केशव  टेकाडे,  रामराव राठोड, दत्तात्रय उगलमुगले,  मनोहर चिंतलू,  कचरू चव्हाण, दत्तात्रय जगताप, अशोक  तिडके,  विश्वास ठाकरे,  सुनील  हरणखेडे, गोरख चव्हाण, अविनाश मराठे,  खामराव वानखेडे, नितीन शिवलकर, हेड कॉन्स्टेबल- प्रभाकर पवार, अंकुश  राठोड, बालू भोई,  श्रीरंग सावरडे, अविनाश सातपुते, मकसूद पठाण, गणेश गोरेगावकर.

आपली प्रतिक्रिया द्या