विधानसभा २०१९ – ‘हे’ दिग्गज राहिले मतदानापासून वंचित

4183

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी 288 जागांवर मतदान पार पडले. 3237 उमेदवारांचे भविष्य जवळपास 9 कोटी मतदारांनी ईव्हीएममध्ये कैद केले आहे. ठिकठिकाणी सकाळपासून सामान्य नागरिकांसह नेते, अभिनेते, खेळाडूंनी मतदानाचा हक्क बजावला. मात्र अनेक दिग्गजांनी मतदान केले नसल्याचे समोर आले आहे.

LIVE- राज्यात 6 वाजेपर्यंत सरासरी 60.5 टक्के मतदान

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मतदानाचा हक्क बजावला नाही. यासह नुकताच फाळके पुरस्कार जाहीर झालेले ‘महानायक’ अमिताभ बच्चन, ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर, अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री कंगना रनौत, सोनम कपूर यांनीही मतदान केले नसल्याचे समोर आले आहे. यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

#विधानसभा2019 खेळाडू ते अभिनेत्यांपर्यंत दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क

दिग्गजांनी बजावला मतदानचा हक्क
दरम्यान, अनेकांनी मतदान मिस केले असले तरी मोठ्या संख्येने दिग्गज मंडळी मतदानासाठी बाहेर पडल्याचेही दिसले. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पत्नी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, रिपाइं नेते रामदास आठवले, माजी केंद्रीय मंत्री राम नाईक, माजी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, नारायण राणे, मनोहर जोशी, मनसे प्रमुख राज ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, शिवसेना नेते एकनाथ शिंदे, अभिनेता आमिर खान, शाहरुख खान, जया बच्चन, ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन, हेमा मालिनी, अनिल कपूर, ऋतिक रोशन, सनी देओल, बॉबी देओल, धर्मेंद्र, परेश रावल, अर्जुन कपूर, वरुण धवन, सलमान खान, दीपिका पादुकोण, ऋषी कपूर, गोविंदा, विद्या बालन, जितेंद्र आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनीही मतदानाचा हक्क बजावला.

आपली प्रतिक्रिया द्या