भांडुप, मुलुंडमध्ये राष्ट्रवादी रिकामी

भांडुप, मुलुंडमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज अक्षरशः रिकामीच झाला. राजेंद्र मोकल, जिल्हाध्यक्षा मनीषा तुपे, विजय गवई, रूपाली सुभेदार, नम्रता सोरसे, फईम कुरेशी, साहिल पाटील यांच्यासह भांडुप, मुलुंडमधील राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले.

राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का, संजय दिना पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

सर्वसामान्य जनतेचा, शेतकऱ्यांचा, कामगारांचा आवाज मंत्रालयापर्यंत पोहोचलाच पाहिजे असे ठामपणे सांगतानाच त्यासाठी शिवसेना-भाजपा-रिपाइं महायुतीचे मजबूत सरकार आणावेच लागेल, असे आवाहन शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. दिंडोशी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुनील प्रभू आणि भांडुप मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रमेश कोरगावकर यांच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरे यांच्या जाहीर सभा आज अनुक्रमे दिंडोशी आणि भांडुपच्या अशोक केदारे चौक येथे झाल्या. या सभांना मोठी गर्दी होती.

नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी महायुतीला तुमची साथ हवी आहे आणि तुमच्या सहकार्याशिवाय ते शक्य नाही असे भावनिक आवाहन यावेळी आदित्य ठाकरे यांनी केले. ते म्हणाले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या सरकारने जी कामे करायला हवी होती ती कामे महायुतीच्या सरकारने गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत केली. मुंबईकरांच्या आशीर्वादाने शिवसेनेने महानगरपालिकेच्या माध्यमातून मुंबईत विकास केला. ते विकासाचे मॉडेल संपूर्ण महाराष्ट्रात न्यायचे आहे असे आदित्य ठाकरे म्हणाले. महाराष्ट्रात भगवा जल्लोष असून सर्वत्र महायुतीचेच झेंडे दिसत आहेत. चित्र असो, चित्रपट असो किंवा पुस्तक असो त्यामध्ये मुंबई जेव्हा दाखवली जाते तेव्हा त्यात भगवा झेंडा हा असतोच. त्यामुळे मुंबईतील सर्वच्या सर्व जागांवर महायुती जिंकणार अशी मला खात्री आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. दिंडोशी येथील सभेला शिवसेना नेते, खासदार गजानन कीर्तिकर, माजी आमदार अभिजीत अडसुळ, महिला विभाग संघटक साधना माने, भाजपाचे माजी आमदार राजहंस सिंह आदी उपस्थित होते तर भांडुप येथील सभेला संजय दीना पाटील, दत्ता दळवी, संध्या वढावकर, भाजपचे अवधूत वाघ यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या