दिंडोशीत शिवसेना बालेकिल्ला राखणारच

700

शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी शिवसेनेच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांत दिंडोशी विधानसभा क्षेत्रात केलेल्या प्रचंड विकासकामांमुळे शिवसेना आपला बालेकिल्ला राखणार असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. यातच शिवसेनेला टक्कर देणारा सक्षम विरोधकच शिल्लक नसल्याने ही लढत एकतर्फी होणार आहे असे बोलले जात आहे.

मुंबईतील वर्षानुवर्षे रखडलेला पुनर्विकास, कायदा सुव्यवस्था, अंगणवाडी सेविकांचे मानधन, शिक्षकांचे प्रश्न, मराठा आरक्षण, शेतकऱ्यांची कर्जमाफी, मराठीची गळचेपी, अशा प्रश्नांवर विधीमंडळात आवाज उठवला. आमदार होण्याआधी शिवसेना नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, मुंबईचे महापौर अशा महत्त्वाच्या पदांवर काम करताना स्वतःच्या विभागासह संपूर्ण मुंबईच्या सर्वांगिण विकासासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेच्या माध्यमातून केलेली विकासकामेच प्रभू यांना पुन्हा एकदा निवडून देतील असे स्पष्ट चित्र दिसत आहे. विधानसभा क्षेत्रात 383 शौचालय प्रकल्पाची पूर्ण केलेली तर 279 प्रस्तावित कामे, पूर्ण झालेली 23 खुली सभागृहे 10 प्रस्तावित, 16 समाजमंदिरांचे काम पूर्ण तर 6 प्रस्तावित, सौंदर्यीकरणाची 56 कामे पूर्ण तर 22 प्रस्तावित, कूपनलिका 21 पूर्ण तर 3 प्रस्तावित आणि संरक्षित भिंतीची 30 कामे पूर्ण तर 11 कामे प्रस्तावित अशी विकासगंगाच प्रभू यांनी दिंडोशीत आणली आहे. प्रभू यांनी 799 लक्षवेधी सुचना मांडल्या असून 1090 तारांकित प्रश्नही उपस्थित केले आहेत.

…म्हणूनच शिवसेना वरचढ
गेल्या पाच वर्षांपासून दिंडोशी शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. गेल्या निवडणुकीत प्रभू यांनी पराभूत केलेले काँग्रेसचे उमेदवार राजहंस सिंह हे आता भाजपमध्ये आले आहेत. यातच गेल्या वेळी राष्ट्रवादीचे उमेदवार राहिलेले अजित रावराणे यांनी तिकीट न मिळाल्यामुळे ते नाराज आहेत. यातच यावेळी आघाडीत काँग्रेसलाही तिकीट न मिळाल्याने त्याचा फटकाही विरोधकांना बसणार आहेत. शिवाय पालिकेच्या वॉर्डमध्ये शिवसेना भाजपचे आठ नगरसेवक आहेत. त्यामुळे शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार सुनील प्रभू यांचे पारडे जड आहे.

आपली प्रतिक्रिया द्या