विधानसभा २०१९ – ‘या’ मतदारसंघात सर्वाधिक, तर ‘येथे’ सर्वात कमी मतदान

1754

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी 288 जागांवर मतदान पार पडले. ईव्हीएममध्ये 3237 उमेदवारांचे भविष्य कैद झाले आहे. ठिकठिकाणी सकाळपासून सामान्य नागरिकांसह नेते, अभिनेते, खेळाडूंनी मतदानाचा हक्क बजावला. अनेक ठिकाणी सायंकाळी पाच नंतरही मतदानाच्या रांगा होत्या, तर काही ठिकाणी मात्र मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले.

विधानसभा २०१९ – ‘हे’ दिग्गज राहिले मतदानापासून वंचित

महाराष्ट्रात सर्वाधिक मतदान हे कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर मतदारसंघात झाले आहे. दोन महिन्यापूर्वी पुराने झोडपून काढलेले असतानाही नागरिकांनी याचा लवलेशही न जाणवू देता भरभरून मतदान केले आहे. येथे सर्वाधिक 83.20 टक्के मतदान पार पडले आहे. तर मुंबईतील कुलाबा या मतदारसंघात सर्वात कमी अर्थात 40.20 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात मतदान जास्त झाल्याने मतदानाप्रती शहरी भागातच सर्वात जास्त जनजागृतीची आवश्यकता असल्याचे जाणवते.

सर्वात जास्त मतदान झालेले मतदारसंघ –

करवीर (Karveer) – 83.20 टक्के
शाहूवाडी (Shahuwadi) – 80.19 टक्के
कागर (Kagal) – 80.13 टक्के
शिराळा (Shirala) – 76.78 टक्के
रत्नागिरी (Ratnagiri) – 75.59 टक्के

सर्वात कमी मतदान झालेले मतदारसंघ –

कुलाबा (Colaba) – 40.20 टक्के
उल्हासनगर (Ulhasnagar) – 41.20 टक्के
कल्याण वेस्ट (Kalyan West) – 41.93 टक्के
अंबरनाथ (Ambarnath) – 42.43 टक्के
वर्सोवा (Versova) 42.66 टक्के

आपली प्रतिक्रिया द्या