कौतुकास्पद! डेंग्यूवर उपचार घेणाऱ्या नातवाने सलाईन काढून आजोबांना नेले मतदानाला

518

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरात मतदान सुरू आहे. 3237 उमेदवारांचे भविष्य जवळपास 9 कोटी मतदार ठरवणार आहेत. ठिकठिकाणी सकाळपासून मतदानासाठी रांगा लागल्या आहेत. नेते, अभिनेत्यांसह खेळाडूंनीही घरातून बाहेर पडत आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. परंतु काही जण मात्र याला राष्ट्रीय सुट्टी समजून फिरायलाही गेल्याचे दुपारपर्यंतच्या मतदानाच्या आकडेवारीवरून दिसते. या सर्वांनाच चपराक लगावणारा एक फोटो सध्या चर्चेचा विषय होत आहे.

Live- राज्यात 3 वाजेपर्यंत सरासरी 43.78 टक्के मतदान

जालना जिल्ह्यातील विद्वान आणि ऋषितुल्य व्यक्तिमत्व डॉ. बद्रीनारायण श्रोत्रिय यांनी वयाच्या 90 व्या वर्षी मतदानाचा हक्क बजावला. डेंग्यूचे उपचार घेणाऱ्या नातवाने स्वत:च्या हातावरचे सलाईन काढून आजोबांना आधार देत मतदानासाठी नेले. जालन्यातील जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या केंद्रावर जावून मतदानाचा हक्क बजावला. यावेळी बुथवरील पोलिसांनीही त्यांना मदत केली.

दोन्ही हात नसलेल्या मतदाराचा राष्ट्रीय ‘कर्तव्य’ बजावतानाचा फोटो व्हायरल

आपली प्रतिक्रिया द्या