हल्ल्यानंतर ओमराजे यांची पहिली प्रतिक्रिया, वाचा सविस्तर बातमी

2961

शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर कळंब मतदारसंघातील पाडोळी येथे जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यानंतर ओमराजे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की ‘मी सुखरूप असून हा हल्ला कोणी केला, याचा मी देखील शोध घेत आहे’

या हल्ल्याबाबत सांगताना ओमराजे म्हणाले की ते ‘नायगांवची सभा आटोपून पाडोळी येथे आले होते. गाडीतून उतरल्यानंतर मोठी गर्दी त्यांच्याभोवती झाली होती. या गर्दीत एक तरुण होता जो ओमराजे यांच्या दिशेने पुढे आला होता. त्याने एका हाताने नमस्कार केला आणि दुसऱ्या हाताने चाकूचा वार केला.’ चाकूचा वार होत असल्याचे दिसल्याने ओमराजे यांनी दुसऱा हात आडवा घातला. यामुळे त्यांच्या पोटावरचा वार हातातील घड्याळावर अडला. यावेळी त्यांच्या हाताला इजा झाली आणि हातातील घड्याळ खाली पडले. यानंतर झालेल्या गोंधळाचा फायदा उचलून हल्लेखोर पळून गेला.

ओमराजे यांनी या घटनेनंतर पोलिसांत तक्रार दिली असून त्यांच्यावर हल्ला केला तरी कोणी याबाबत मोठं गूढ निर्माण झालं आहे. आपल्या सभांमध्ये गेल्या 2-3 दिवसांपासून दारू प्यायलेली माणसे पाठवली जात असल्याची धक्कादायक माहितीही ओमराजे यांनी दिली आहे. या बेवड्यांद्वारे सभेत गोंधळ निर्माण करण्याचे प्रयत्न होत असल्याचा संशय ओमराजे यांना आहे. द्वेष भावनेने लढण्यापेक्षा विचारांची लढाई विचारानेच लढावी असे कणखर उद्गार ओमराजे यांनी त्यांच्यावर हल्ला करणाऱ्यांबद्दल तसेच विरोधकांबद्दल काढले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या