धनंजय मुंडेंच्या वक्तव्याला क्षमा नाही – पंकजा मुंडे

10472
pritam-pankaja-munde

‘धनंजय मुंडे हे अत्यंत घाणेरडे राजकारण करत आहेत. त्यांची भाषा अत्यंत घाणेरडी आहे. घाणेरडे हातवारे करून असे बोलत असेल तर धनंजय मुंडे यांच्या वक्तव्याला कधी क्षमा नाही’, अशी स्पष्ट भूमिका पंकजा मुंडे यांनी मांडली आहे. धनंजय मुंडे यांच्या एका व्हायरल क्लिप नंतर हा वाद सुरू आहे. या क्लिपमध्ये धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्याबद्दल गलीच्छ भाषा वापरल्याची तक्रार भाजप समर्थक कार्यकर्त्यांनी केली आहे. या सर्व प्रकारासंदर्भात एका मराठी वृत्तवाहिनीवर मुलाखत देताना पंकजा मुंडे यांनी आपली भूमिका पहिल्यांदाच समोर मांडली.

धनंजय मुंडे हा विषय माझ्यासाठी संपलेला आहे. हे नाव माझ्या मुखात पुन्हा येणार नाही. धनंजयला माझ्या शुभेच्छा आहेत. मात्र मी देवाकडे एवढीच प्रार्थना करेन की त्याच्या पापाची शिक्षा त्याच्या परिवाराला मिळू नये, असेही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या. तसेच या सर्व प्रकरणी आपण कुठलीही तक्रार पोलिसात केलेली नाही, तसेच कुठेही न्याय मागण्यासाठी जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शरद पवारांवरही नाराजी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील पंकजा मुंडे यांच्यावरील धनंजय यांच्या भाषेबद्दल कानउघडणी केली नाही. त्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. पवारसाहेबांकडून अशी अपेक्षा नव्हती. ते स्वत:च विचित्र हातवारे करत आहेत, त्यामुळे त्याचे उमेदवारही तशीच भाषा बोलत आहेत. सुप्रियाबद्दल असं कोणी बोललं असतं तर गोपिनाथ मुंडे यांनी अशी भाषा वापरली नसती. कठोर भूमिका घेतली असती, असेही त्या यावेळी म्हणाल्या.

आपली प्रतिक्रिया द्या