#विधानसभा2019 खेळाडू ते अभिनेत्यांपर्यंत दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क

9493

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरात मतदान सुरू आहे. 3237 उमेदवारांचे भविष्य जवळपास 9 कोटी मतदार ठरवणार आहेत. ठिकठिकाणी सकाळपासून मतदानासाठी रांगा लागल्या आहेत.

पावसाने उघडीप दिल्याने मतदारांनी घराबाहेर पडून आपले कर्तव्य बजावले. यासह राज्यातील दिग्गजांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. मुंबईतील अनेक खेळाडूंसह अभिनेते, अभिनेत्रींनी उत्साहात मतदान पार पाडले. बॉलिवूड अभिनेते आमिर खान, पत्नी किरण राव, अभिनेता जॉन अब्राहम, वरुण धवन, ऋतिक रोशन, अनिल कपूर, ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा, अभिनेत्री दीपिका पदुकोन, करीन कपूर-खान यांनी मतदानाचा हक्क बजावला.

Live- राज्यात 2 वाजेपर्यंत सरासरी 30.63 टक्के मतदान

या दिग्गजांसह टीम इंडियाचा माजी खेळाडू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने पत्नी अंजली व मुलगा अर्जुन यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला. मतदान केल्यानंतर सचिनने एक फोटो पोस्ट करत सर्वांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. मतदान करणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. माझे मत मी नोंदवले आहे, आपण सर्वसुद्धा मतदान करून या लोकशाहीच्या सोहळ्याचा भाग व्हा, असे आवाहन सचिनने केले आहे.

दरम्यान, राज्यात 2 वाजेपर्यंत सरासरी 30.63 टक्के मतदान झाले आहे. मतदान योग्यरित्या पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज आहे. तुरळक प्रकार वगळता अनेक ठिकाणी शांततेत मतदान सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या