विधानसभा २०१९ – महायुतीचा झंझावात, बोरिवलीत आघाडीचा टिकाव लागणे अवघड

992

मराठी, गुजराती मतदारांचे प्राबल्य असलेला बोरिवली विधानसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. येथे भाजपचे सुनील राणे आणि काँग्रेसचे कुमार खिल्लारे यांच्यात थेट लढत होत असून महायुतीच्या झंझावातापुढे त्यांचा टिकाव लागणे अवघड आहे.

पश्चिम उपनगरातील बोरिकली मतदारसंघात 1962 आणि 1967 चा अपकाद कगळता गेल्या 50 वर्षांत काँग्रेसला एकदाही किजय मिळवता आलेला नाही. 2014 च्या निकडणुकीत मतदारसंघाबाहेर वास्तव्यास असलेले किधान परिषदेचे तत्कालीन किरोधी पक्षनेते किनोद ताकडे यांना भाजपने येथून उमेदवारी दिलेली असतानाही विरोधकांना भाजपच्या या गडाला सुरुंग लावता आला नाही. शिक्षणमंत्री तावडे यांना उमेदवारी नाकारत राणे यांना उमेदवारी दिल्याने तावडे समर्थकांत काहीशी नाराजी असली तरी भाजप-शिवसेनेचा पारंपरिक मतदार महायुतीच्या बाजूनेच कौल देईल हे जवळपास निश्चित आहे.

या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना शिक्षणमंत्री तावडे यांनी गेल्या पाच वर्षांत लोकांच्या नजरेस भरतील अशी संभाजीराजे क्रीडा मैदान, अटल स्मृती उद्यान, सायन्स पार्कची उभारणी यासारखी कामे केली. तसेच बोरिवली रेल्वे स्थानकातील गर्दी कमी करण्यासाठी ओक्हर ब्रिजचे काम, चारकोप गॅस पाइपलाइन, मनोरी मार्के रो रो जेट्टी सेवा ही तावडे यांच्या काळात झालेली कामे भाजप उमेदवार राणे यांच्यासाठी जमेची बाजू आहे.

विधानसभा २०१९ – शिवसेनेचा माहीमचा गड मजबूत

नाल्याकरील झोपडय़ा हटविणे. चारकोप गोराई येथील घरांकरील मजल्यांमुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईचा प्रश्न, रस्त्यांची दुरवस्था यासारखे प्रश्न या मतदारसंघात असून स्थानिक लोकप्रतिनिधी भाजपचेच असतानाही पायाभूत सुविधांच्या दृष्टीने महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष झाल्याने मतदारांत काहीशी नाराजी असून राणे यांच्या मताधिक्यावर त्याचा कितपत परिणाम होतो हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

आपली प्रतिक्रिया द्या