विधानसभा 2019 – शिवसेनेचा माहीमचा गड मजबूत

3645

माहीम विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा भक्कम बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या विभागात सर्वच्या सर्व नगरसेवक शिवसेना-भाजप महायुतीचे आहेत. त्यातील पाच नगरसेवक शिवसेनेचे तर एक भाजपचा आहे. खासदार राहुल शेवाळे शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार म्हणून पुन्हा निवडून आले आहेत. तर विद्यमान आमदार शिवसेनेचेच सदा सरवणकर आहेत. शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार म्हणून सदा सरवणकर म्हणून पुन्हा निवडणूक रिंगणात आहेत. विद्यमान आमदार म्हणून सदा सरवणकर यांनी अतिशय मजबूतपणे हा मतदारसंघ बांधून ठेवला आहे. जुन्या वाडय़ांपासून उंच टॉवर आणि सोसायटय़ा असलेल्या या मतदारसंघात सदा सरवणकर यांनी प्रत्येक स्वतःच्या कामाचा ठसा उमटवला आहे. या मतदारसंघात असंख्य वाडय़ा आहेत. या वाडय़ांमध्ये लाद्यांपासून पाण्याचे पाइप, मलनिस्सारण वाहिन्यांची कामे केली आहे. त्यामुळे वाडय़ांमध्ये ते प्रत्येक घराघरांमध्ये पोहोचले आहेत.

मतदारसंघाच्या समस्या

या मतदारसंघात जुन्या वाडय़ांच्या पुनर्विकासापासून जुन्या उपकरप्राप्त इमारतींची दुरुस्ती व पुनर्विकासाचा प्रश्न अतिशय जटील आहे. पुनर्विकासाचे प्रकल्प रखडले आहेत. पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. फेरीवाल्यांचा प्रश्न प्रलंबित आहेत. खचत जाणारी चौपाटी  व सध्या कार पार्किंगचा प्रश्न मोठा झाला आहे.

कामाचा धडाका

विद्यमान आमदार म्हणून सदा सरवणकर यांनी या मतदारसंघात कामाचा धडाका लावला आहे. या विभागातील नागरिकांचे अपुऱ्या पाण्यामुळे हाल सुरू होते. पण मतदारांची ही समस्या गांभीर्याने घेऊन त्यावर अनेक उपाययोजना केल्या. 56 इंच जलवाहिनीवर छेद देऊन पाण्याची समस्या सोडवली. पालिकेच्या जलवाहिनीला छेद देऊन पाणी पुरवठा वाढवण्याचे काम केले. अशा प्रकारचे काम मुंबईत प्रथमच झाले आहे.  या मतदारसंघात पोलीस वसाहतीची समस्या अतिशय गंभीर आहे. पोलीस वसाहतीचा पुनर्विकास करून त्या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांची निवासस्थाने बांधण्याचा प्रस्ताव होते, पण आमदार म्हणून सरवणकर यांनी या योजनेला विरोध केला. पात्र झोपडपट्टीधारकांना मोफत घर दिले जाते त्याच धर्तीवर पोलीस वसाहतीचा पुनर्विकास करताना मोफत घर मिळवून देण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. दादर-माहीम-शिवाजी पार्कच्या चौपाटीचे व माहीमच्या किल्ल्याचे संवर्धन करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. या मतदारसंघातील वाडय़ांमध्ये नागरी विकासाची असंख्य कामे केली आहेत. जवळपास प्रत्येक वाडीमध्ये गटारवाहिनी, जलवाहिनी, शौचालय, लादीकरण समाज मंदिर, मैदान सुशोभीकरण, वाचनालयाचे नूतनीकरण, ड्रेनज लाइन, ज्येष्ठ नागरिक कट्टा अशी असंख्य कामे केली आहेत. त्यामुळे त्यांना विधानसभा निवडणुकीची उमेदवारी दिली आहे. त्यांच्या समोर मनसेचे संदीप देशपाडे व काँग्रेसचे प्रवीण नाईक, अपक्ष उमेदवार मोहनीश राऊळ रिंगणात आहेत. संदीप देशपांडे यांचा जनसंपर्क दांडगा आहे. स्थानिक प्रश्न घेऊन ते निवडणूक रिंगणात आहेत, पण शिवसेनेचा गड मजबूत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या