तलवारी म्यान, तोफा थंडावल्या! भरपावसात प्रचारसभा, बाईक रॅली व प्रचारयात्रांचा धडाका

4362

गेला महिनाभर सुरू असलेला विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज सायंकाळी संपला. आरोप-प्रत्यारोपांच्या तलवारी म्यान झाल्या आणि तोफाही थंडावल्या. पूर्वी निवडणुकांचा जाहीर प्रचार संपला की कंदील प्रचार सुरू व्हायचा. आता मोबाईलमध्येच बॅटरी आल्याने कंदील अडगळीत गेला आणि सोशल मीडियाचा बोलबाला झाला. आता सोमवारी मतदानापर्यंत एकीकडे पक्षकार्यालयांमध्ये जोरबैठका आणि मोर्चेबांधणी सुरू झाली आहे, तर दुसरीकडे सोशल मीडियाचाही ऍलर्ट टोन वाजू लागला आहे.

Photo : आदित्य ठाकरे यांचा भर पावसात प्रचार

विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी प्रचाराचे रान उठवून दिले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी तर अवघा महाराष्ट्र पिंजून काढला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभर प्रचारसभांचा धडाका केला. राष्ट्रवादीकडून स्वतः पक्षाध्यक्ष शरद पवार प्रचाराच्या रणांगणात उतरले तर काँग्रेससाठी राहुल गांधी महाराष्ट्रात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांनीही प्रचारसभांचा धुरळा उडवला. छोटय़ा प्रचारसभा, चौकसभा, विराट सभा, रोड शो, रॅली, पदयात्रा आणि मतदारांच्या वैयक्तिक भेटीगाठी घेऊन उमेदवार, नेत्यांनी वातावरण ढवळून काढले.

चुक‍ा घडल्या पण पाठीत खंजीर खुपसला नाही! उदयनराजेंचे पवारांना प्रत्युत्तर

गुरुवारपर्यंत धाकधूक

आजही प्रचाराच्या अखेरच्या दिवशी प्रचंड शक्तिप्रदर्शन करत सर्वच उमेदवारांनी मतदारसंघ पिंजून काढले. दिवसभर कोसळणाऱ्या पावसाची तमा न बाळगता प्रचार सुरूच ठेवला आणि मतदारांशी संवाद साधला. आता प्रतीक्षा सोमवार 21 ऑक्टोबरची. या दिवशी प्रत्येक उमेदवाराचे राजकीय भवितव्य मतदानयंत्रात बंद होईल आणि 24 तारखेला निकाल लागेल. तोपर्यंत सर्वच पक्षांच्या उमेदवारांची धाकधूक वाढणार आहे हे नक्की!

आपली प्रतिक्रिया द्या