विधानसभा२०१९ – मतदारांसाठी केला ‘जुगाड’, अंथरला ट्रॅक्टर ट्रॉली गालीचा

1027

ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत पावसाने फेर धरला. सोलापूर जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्राबाहेर पाण्याची तळी साठली तर काही ठिकाणी रस्ते चिखलमय झाले. या नैसर्गिक समस्येला नाके न मुरडता मतदारांनी ट्रॅक्टर ट्रॉली एकमेकांना जोडून मतदान केंद्रापर्यत रस्ता जोडला. ट्रॉली गालीचाचे हे जुगाड अकलूज येथील आहे.

दोन्ही हात नसलेल्या मतदाराचा राष्ट्रीय ‘कर्तव्य’ बजावतानाचा फोटो व्हायरल

मतदान प्रक्रियेच्या मध्यरात्री पावसाने जोरदार हजेरी लावली. अनपेक्षित झालेल्या या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्राकडे जाणारे रस्ते चिखलमय झाले, तर काही ठिकाणी पाण्याचे तळे साचले होते. या सर्व आपत्तीतून मार्गक्रमण करीत मतदारांनी उस्फूर्तपणे आपला हक्क बजावला आहे. या फोटोची चर्चा सर्वत्र होत आहे.

चिखल तुडवत ते केंद्रावर पोहोचले, पण मतदानाचा हक्क बजावलाच

आपली प्रतिक्रिया द्या