भिवंडी ग्रामीणचे उमेदवार महादेव घाटाळ यांच्या प्रचाराचा शुभारंभ; उद्धव ठाकरे यांची आज अंबाडीत दणदणीत सभा

भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्ष महाविकास आघाडीचे उमेदवार महादेव घाटाळ यांच्या प्रचाराचा नारळ उद्या 6 नोव्हेंबर रोजी  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वाढवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी 3 वाजता अंबाडीत उद्धव ठाकरे यांची दणदणीत जाहीर सभा होणार असून या सभेत गद्दारांचा ते काय समाचार घेणार याकडे भिवंडीवासीयांचे लक्ष लागले आहे.

भिवंडी ग्रामीणमधून शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार महादेव घाटाळ यांना चांगला प्रतिसाद मिळत असून कोणत्याही परिस्थितीत विजयश्री खेचून आणणारच, असा निर्धार महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. अंबाडी नाका येथे दुपारी 3 वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भव्य प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेची जय्यत तयारी झाली असल्याची माहिती जिल्हाप्रमुख विश्वास थळे यांनी दिली.