भाजपाचे वेट ऍण्ड वॉच -सुधीर मुनगंटीवार

958

राज्यातील जनतेने स्पष्ट जनादेश देऊनही केवळ कोणाच्या तरी हट्ट, आग्रहामुळे आज राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली असल्याची खरमरीत टीका भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. असे असले तरी भाजपा राज्यातील अडचणीत आलेल्या शेतकऱयांच्या पाठीशी ठाम उभा आहे. सध्या तरी भाजपाची वेट अँड वॉचची भूमिका कायम असून भाजपा योग्य वेळी आपली भूमिका जाहीर करेल असेही ते म्हणाले.

भाजपाच्या कोअर टिमच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यातील जनतेने स्पष्ट जनादेश दिला होता. आम्ही कधीच कोणत्याही पर्यायांचा शोध घेतला नाही. राज्यपालांनी आमंत्रण देऊनही कोणत्याही पक्षाने सरकार स्थापनेचा दावा केला नाही. 18 दिवस त्यांना कोणत्याही पक्षाचे समर्थन प्राप्त होऊ शकले नाही. राज्यात राष्ट्रपती राजवट लागणे हा जनादेशाचा अवमान आहे. शेतकरी, शोषितांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्थिर सरकार येणे आवश्यक होते, असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या