काँग्रेस, राष्ट्रवादी थकले नव्हे चुकले

870
ramdas-athawale

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष थकले नसून ते चुकले आहेत. या दोन्ही पक्षांना लोकांची नेमकी भावना ओळखता आली नाही, असा टोला रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी लगावला आहे. आज गुरुवारी चांदिवली विधानसभेचे महायुतीचे उमेदवार दिलीप लांडे यांच्या प्रचारार्थ साकिनाका येथे आयोजित सभेत ते बोलत होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने वर्षानुवर्षे दलितांमध्ये सरकार संविधान बदलणार असा गैरसमज पसरवला. त्यामुळे जनतेने दोघांनाही धडा शिकवला. आता काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक नेते शिवसेना-भाजपात प्रवेश करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा जनमानसात असल्यामुळे महायुतीलाच राज्यात प्रचंड विजय मिळेल असा विश्वासही आठवले यांनी यावेळी व्यक्त केला.

आपली प्रतिक्रिया द्या