
मराठा, धनगर, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण सध्या तापलेले आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील मैदानात उतरले आहेत, तर धनगर समाजानेही अनुसुचित जातीमध्ये समावेश करावा यासाठी आंदोलन उभे केले आहे. तर दुसरीकडे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नका यासाठी सत्तेतील मंत्र्यांनीही सभांवर सभा सुरू केल्या आहेत. एकंदरीत महाराष्ट्रातील वातावरण तापलेले असताना भारतीय जनता पक्षाच्या नेत्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनीही हा फोटो शेअर केला आहे.
महाराष्ट्र पेटलेला असताना हे महाशय मकाऊ येथील कसिनोत जुगार खेळत आहेत. फोटो झुम करून पहा… ते तेच आहेत ना? पिक्चर अभी बाकी है… असे ट्विट खासदार संजय राऊत यांनी केले.
महाराष्ट्र पेटलेला आहे…
आणि हे महाशय मकाऊ येथे कासिनोत जुगार खेळत आहेत.
फोटो zoom करुन पहा…ते तेच आहेत ना?पिक्चर अभी बाकी है…@BJP4Maharashtra @AmitShah @AUThackeray @Dev_Fadnavis pic.twitter.com/cfhswYn7Zx— Sanjay Raut (@rautsanjay61) November 20, 2023
दुसऱ्या एका ट्विटमध्ये त्यांनी हा फोटो नक्की कधीचा आहे याचाही उल्लेख केला आहे. संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले की, 19 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री मकाऊ येथील veneshine येथे या महाशयंनी साधारण साडे तीन कोटी रुपये कसिनो जुगारात उडवले असे प्रत्यक्षदर्शी सांगतात. हिंदुत्ववादी असल्याने महाशय दयूत खेळले तर बिघडके कोठे? ते तेच आहेत ना? असा सवालही राऊत यांनी केला. यानंतर हा फोटो चंद्रशेखर बावनकुळे यांचा असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
19 नोव्हेंबर
मध्यरात्री
मुक्काम पोस्ट: मकाऊ,veneshine.
साधारण 3.50 कोटी कॅसिनो जुगारात उडवले असे प्रत्यक्ष दर्शी सांगतात.
हिंदुत्ववादी असल्याने महाशय द्युत ..खेळले तर बिघडले कोठे?
ते तेच आहेत ना?@BJP4Maharashtra @AUThackeray @Dev_Fadnavis @AmitShah pic.twitter.com/XlScC63h2Q— Sanjay Raut (@rautsanjay61) November 20, 2023
दरम्यान, या व्हायरल फोटोवर भाजपने स्पष्टीकरण देताना ते फॅमिलीसह मकाऊला गेल्याचे म्हटले. याचाच उल्लेख करत संजय राऊत यांनी आणखी एक ट्विट केले आहे. ,ते म्हणे…फॅमिल सह मकाऊ ला गेले आहेत. जाऊ द्या. त्यांची सोबत बसलेली फॅमिली चिनी आहे का? कधीच जुगार खेळले नाहीत, मग ते नक्की काय करीत आहेत? त्यांच्या टेबलावर मारुती स्तोत्र आहे का? जेवढे खुलासे कराल तेवढे फसाल! झाला तेवढा तमाशा पुरेसा नाही काय!’, असे ट्विट राऊत यांनी केले.
ते म्हणे..
फॅमिल सह मकाऊ ला गेले आहेत..जाऊ द्या.
त्यांची सोबत बसलेली फॅमिली चिनी आहे का?
ते म्हणे..
कधीच जुगार खेळले नाहीत..
मग ते नक्की काय करीत आहेत? त्यांच्या टेबलावर मारुती स्तोत्र आहे का?
जेवढे खुलासे कराल तेवढे फसाल!
झाला तेवढा तमाशा पुरेसा नाही काय!@BJP4Maharashtra… pic.twitter.com/aIjd3eJTO0— Sanjay Raut (@rautsanjay61) November 20, 2023
नाना पटोले यांची प्रतिक्रिया
चंद्रशेखर बावनकुळे यांच्या व्हायरल फोटोवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. एकीकडे महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती आहे आणि दुसरीकडे त्या फोटो भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिसताहेत. हा फोटो तपासला पाहिजे. वेळ आली तर सीबीआयची चौकशी व्हायला पाहिजे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष कसिनोत जाऊन जुगार खेळत असतील तर ही महाराष्ट्रासाठी गंभीर बाब आहे, असे नाना पटोले म्हणाले.