महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरचे वजन वाढले, जिल्ह्याला मिळाली तीन मंत्रीपदे

3323

महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळविस्तार सोहळा सोमवारी पार पडला. विधान भवन मुंबई येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यामध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. त्याशिवाय 25 सदस्यांना कॅबिनेट मंत्रीपदाची तर 1 सदस्यांना राज्यमंत्री पदाची शपथ दिली. महाविकास आघाडी सरकारमध्ये नगर जिल्ह्याला तीन मंत्रीपदे मिळाली आहेत.

अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश, वाचा संपूर्ण यादी

पहिल्यांदाच आमदार झालेले राहुरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्राजक्त तनपुरे यांना राज्यमंत्रीपद तर शिवसेनेला पाठिंबा दिलेले नेवासा मतदारसंघाचे अपक्ष आमदार शंकरराव गडाख यांची कॅबिनेटपदी वर्णी लागली आहे. सलग सात वेळा निवडून आलेले काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी यापूर्वीच कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

#MaharashtraPolitics शिवसेनेच्या ‘या’ नेत्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

नेवासा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आलेले आमदार शंकराव गडाख यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाचे प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी मतदार संघामध्ये भाजपाचे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांचा पराभव केला होता. त्यामुळे प्राजक्त तनपुरे यांना रविवारी सायंकाळी अचानकपणे फोन आल्यानंतर ते मुंबईकडे रवाना झाले होते. त्यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश झाला आहे. दुसरीकडे नगर जिल्ह्यामध्ये सलग सात वेळा निवडून येण्याचा मान बाळासाहेब थोरात यांना मिळाला होता. त्यांना अगोदरच कॅबिनेट मंत्रिपद मिळाले आहे. त्यामुळे या मंत्रिमंडळामध्ये आता नगर जिल्ह्यातील तीन जणांचा समावेश झाला आहे.

अशोक चव्हाणांसह ‘या’ काँग्रेस नेत्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ, वाचा सविस्तर…

आपली प्रतिक्रिया द्या