राधाकृष्ण विखे-पाटील, जयदत्त क्षीरसागरांसह 13 नव्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश

जयदत्त क्षीरसागर

सामना ऑनलाईन, मुंबई

गेले अनेक दिवस चर्चेत असलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी पार पडला. राधाकृष्ण विखे-पाटील, जयदत्त क्षीरसागर यांच्यासारख्या माजी मंत्र्यांना या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळालं आहे. या दोघांनाही महत्वाची खाती मिळणार आहेत. आज 8 कॅबिनेट तर 5 राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. राजभवनात झालेल्या या सोहळ्यादरम्यान जय भवानी, जय शिवाजी तसेच शिवसेना-भाजप युतीचा विजय असो अशा घोषणांनी या मंत्र्यांच्या समर्थकांनी आसमंत दणाणून सोडला होता.

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील 6 मंत्र्यांना डच्चू, वाचा कोण आहेत हे मंत्री

 

राज्यपाल सी.विद्यासगर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नव्या मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. सोमवारपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. या अधिवेशनापूर्वी राधाकृष्ण विखे-पाटील आणि जयदत्त क्षीरसागर या पूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर जयदत्त क्षीरसागर यांनी विरोधकांबाबत बोलताना सांगितले की ते गर्भगळीत झाले असून ते कोणत्या अवस्थेत आहेत हे जनतेला माहिती आहे अशा शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली. आज झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिवसेना, भाजपसह रिपाईंलाही स्थान देण्यात आलं आहे. रिपाईंचे अविनाश महातेकर यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली

आज ज्या मंत्र्यांनी शपथ घेतली त्यांची नावे खालील प्रमाणे आहेत

कॅबिनेटमंत्री

 • राधाकृष्ण विखे पाटील
 • जयदत्त शिरसागर
 • आशिष शेलार
 • संजय कुटे
 • सुरेश दगडू खाडे
 • अनिल बोंडे
 • अशोक उईके
 • तानाजी जयवंत सावंत

राज्यमंत्री

 • योगेश सागर
 • अविनाश माहतेकर
 • संजय भेगडे
 • परिणय फुके
 • अतुल सावे
आपली प्रतिक्रिया द्या