महाराष्ट्राच्या कोरोनाविरोधातील लढाईविषयी पंतप्रधानानी केले कौतुक

कोरोनाविरुद्धच्या लढाईत महाराष्ट्र करीत असलेल्या प्रयत्नांबद्धल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून दूरध्वनीद्वारे माहिती घेतली. दुसऱ्या लाटेशी मुकाबला करतांना महाराष्ट्र चांगली लढाई लढतो आहे अशा शब्दात पंतप्रधानांनी कौतुक केले.

मुख्यमंत्र्यांनी यावेळी महाराष्ट्राला ऑक्सिजनच्या बाबतीत अधिकचे बळ मिळावे अशी विनंती पंतप्रधानांना केली. महाराष्ट्र सरकारने कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी हाती घेतलेल्या विविध उपाययोजनांची माहितीही मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधानांना दिली.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी महाराष्ट्राचे नियोजन कसे आहे याबाबतही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना माहिती दिली. पंतप्रधान आणि केंद्र सरकार हे कोरोनाविरोधातील लढ्यात महाराष्ट्राला पहिल्यापासून मार्गदर्शन करीत असून त्याचा चांगला उपयोग राज्य सरकारला होतो आहे असे म्हणत, महाराष्ट्राच्या काही सुचना केंद्राने मान्य केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले

आपली प्रतिक्रिया द्या