तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा! मुख्यमंत्र्यांचा तळीये दुर्घटनाग्रस्तांना आधार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शनिवारी महाड तालुक्यातील तळीये गावात पोहोचले

whatsapp-image-2021-07-24-at-14-52-27

तळीये गावात ज्या ठिकाणी दरड कोसळली होती, त्या भागाची मुख्यमंत्र्यांनी पाहाणी केली

whatsapp-image-2021-07-24-at-14-52-24

यावेळी त्यांच्यासोबत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनिल तटकरे हे उपस्थित होते

whatsapp-image-2021-07-24-at-14-52-29

तुमच्यावर कोसळलेला प्रसंग मोठा आहे. त्यामुळे तुम्ही स्वत:ला सावरा. बाकीच्या गोष्टी सरकारवर सोडा. आम्ही तुमचं पुनर्वसन करू. सर्वांना मदत दिली जाईल, अशा शब्दांत आधार देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तळीये गावातील मृतांच्या नातेवाईकांचे अश्रू पुसले.

मुख्यमंत्री आज दुपारी सव्वा दोनच्या सुमारास तळिये गावात पोहोचले. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री आदिती तटकरे, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, परिवहन मंत्री अनिल परब, मिलिंद नार्वेकर, खासदार सुनील तटकरे, आमदार भरत गोगावले, मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि जिल्हाधिकारी निधी चौधरी आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री भरपावसात चिखलातून वाट काढत घटनास्थळी पोहोचले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घटनास्थळी येताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांना घटनेची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी स्थानिकांचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यांचं सांत्वन करत त्यांना धीर दिला.

आपली प्रतिक्रिया द्या