मोक्कातील फरार आरोपी रवींद्र बऱ्हाटे याची माहिती देण्याचे पोलिसांचे आवाहन

महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मोक्का) कारवाई करण्यात आलेला माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे अद्यापही फरार आहे. त्याचा ठावठिकाणा माहित असल्यास नागरिकांनी त्वरीत पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे

बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी मागितल्याप्रकरणी रवींद्र बऱ्हाटेंसह त्याच्या साथीदारांविरोधात कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात 8 आरोपीं विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

बऱ्हाटे आणि साथीदारांविरोधात शहरातील इतर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यानंतर त्याला फरार घोषित केले आहे. फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक सुधीर कर्नाटकी यांनी तक्रार दिली आहे.

याप्रकरणी बऱ्हाटे, दीप्ती आहेर, देवेंद्र जैन, शैलेश जगताप, अमोल चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागरिकांना बऱ्हाटेबाबत काही माहिती असल्यास कोथरूड पोलीस ठाण्यात (दूरध्वनी- 202- 25391010 किंवा 25391515) देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या