राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 77,793 वर, आज 1352 रुग्णांना डिस्चार्ज; रिकव्हरी रेट 43.29 टक्के

923

राज्यात आज गुरुवारी 2,933 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे राज्यातील एकूण संख्या आता 77, 793 झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यातील रिकव्हरी रेट 43.29 असून मृत्युदर 3.48 टक्के आहे.

पाश्चिमात्य देशांची नक्कल केल्याने ‘कोरोना’ ऐवजी अर्थव्यवस्थाच नष्ट झाली; उद्योगपती राजीव बजाज यांची टीका

आज नवीन 1352 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आजपर्यंत एकूण 33681 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 41393 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर 123 रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण आकडा 2710 वर पोहोचला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या