मुख्यमंत्र्यांचा प्रमुख विरोधी पक्षनेते व मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांशी संवाद

राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने कडक निर्बंध लागू करण्यात आले असून विकेंड लॉकडाऊनमुळे शनिवार-रविवार हे दोन दिवस लोकांना घरातच थांबावे लागणार आहे. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जमावबंदी, रात्रीची संचारबंदी यांसारख्या उपाययोजना केल्यानंतरही रुग्णवाढीचा वेग कमी होताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दुपारी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रमुख विरोधी पक्ष नेते व मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांशी ऑनलाईन बैठकीत संवाद साधत आहेत. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील, एकनाथ शिंदे, जयंत पाटील, राजेश टोपे, अमित देशमुख, तसेच नाना पटोले, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील आदींची उपस्थिती आहे.

बैठकीच्या प्रारंभी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी कोविड परिस्थिती आणि निर्माण झालेल्या आव्हानाला शासन कसे तोंड देत आहे त्याची माहिती दिली.

आपली प्रतिक्रिया द्या