समाजातील शेवटच्या घटकाला न्याय द्यायचाय! आदित्य ठाकरे यांची घोटी येथे खणखणीत सभा

797
aditya-thackeray-rally-in-n

इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघातील महायुतीच्या शिवसेना उमेदवार आमदार निर्मला गावीत यांच्या प्रचारार्थ घोटी येथे आयोजित जाहीर सभेत शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, संपर्कप्रमुख भाऊ चौधरी आदी उपस्थित होते.

राम मंदिराला पाठिंबा देणाऱ्या मुस्लीम अभ्यासकाला धक्काबुक्की

महिला, सुशिक्षित बेरोजगार, शेतकरी, विद्यार्थी, गोरगरीब अशा समाजातील शेवटच्या घटकांचा आवाज मी ऐकलाय, त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी, त्यांना न्याय देण्यासाठी मी नवा महाराष्ट्र घडविण्याचे स्वप्न बघतोय. ते पूर्ण करण्यासाठी भाजपा-शिवसेना महायुतीला तुमची खंबीर साथ द्या, असे आवाहन शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.

मूर्ती विसर्जनावेळी धर्मांधांचा राडा, जहानाबाद जिल्ह्यात कलम 144 लागू

 

इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघातील महायुतीच्या शिवसेना उमेदवार आमदार निर्मला गावीत यांच्या प्रचारार्थ घोटी येथे आज आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. निवडणुकांच्या काळात सर्वच  राजकीय पक्षांचे नेते येतात-जातात, हार-जीत होत असते; परंतु लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमधल्या म्हणजे निवडणुका नसतानाच्या काळात माझ्यासह शिवसेनेचे नेते जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्यभर फिरले. सत्तेत असतानाही दुष्काळ, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेनेने आवाज उठविला, प्रसंगी आंदोलने केली. गेली पन्नास वर्षे शिवसेना जनतेसाठी सातत्याने काम करते, हे राज्यभरातील दौऱ्यात जनतेनेच सांगितले. मी राज्यातील पंचवीस जिह्यात फिरलो, तेव्हा जनतेच्या मनातील व्यथा समजून घेतल्या. बेरोजगार तरूण, विद्यार्थी, शेतकरी, कामगार, गोरगरीब अशा शेवटच्या घटकाचा आवाज ऐकला, त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी, त्यांना न्याय देण्यासाठी, जे मंत्रालयात कधीही आले नाहीत त्यांच्यासाठी मी नवा महाराष्ट्र घडविण्याचे स्वप्न पाहतोय. त्यासाठीच मी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतलाय. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी महायुतीला साथ द्या, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी करताच उपस्थित जनसमुदायाने टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटाने प्रतिसाद दिला.

उद्योग असूनही नोकऱ्या नाहीत, अशी स्थिती आहे. सत्ता आल्यानंतर सध्याचा अभ्यासक्रम बदलून रोजगाराभिमुख अभ्यासक्रम अंमलात आणला जाईल, व्हर्च्युअल क्लासरूमद्वारे मुंबईसह राज्यात शिक्षणाच्या समान सुविधा देण्यात येतील. खतांच्या किंमती पाच वर्षांसाठी स्थिर ठेवल्या जातील. सरसकट कर्जमुक्ती करून सातबारा कोरा करण्यात येईल, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. यावेळी जिल्हाप्रमुख विजय करंजकर, खासदार हेमंत गोडसे, अजय बोरस्ते, चंद्रकांत लवटे, सुधाकर बडगुजर आदी उपस्थित होते.

राज्यात शिवशाही येणार- संजय राऊत

राज्यात शिवशाही येणार, असा विश्वास शिवसेना नेते, उत्तर महाराष्ट्र विभागीय नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. शिवशाहीच्या रथाची चाकं ही उत्तर महाराष्ट्रात आहे. इगतपुरी हे प्रवेशद्वार आहे. नाशिकपासून ते नंदुरबारपर्यंत विजय संपादन करून आपण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना देवू, असेही खासदार राऊत म्हणाले.

सत्तेत असतानाही दुष्काळ, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेनेने आवाज उठविला, प्रसंगी आंदोलने केली. गेली पन्नास वर्षे शिवसेना जनतेसाठी सातत्याने काम करते, हे राज्यभरातील दौऱ्यात जनतेनेच सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या