महाविद्यालयीन शिक्षण मोफत देणार! उद्धव ठाकरे यांची घोषणा

1025
uddhav-thackeray

अनेक विद्यार्थी हुशार आहेत. पण गरिबीमुळे ते महाविद्यालयीन शिक्षण घेऊ शकत नाहीत. आम्ही पुन्हा सत्तेवर आल्यावर या गरीब विद्यार्थ्यांची शैक्षणिक आबाळ होऊ देणार नाही. त्यासाठी महाविद्यालयीन शिक्षण मोफत करणार असल्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. एवढेच नव्हे तर, 15 लाख विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. मराठवाडय़ातील संभाजीनगर, वैजापूर, कन्नड आणि घनसावंगीत उद्धव ठाकरे यांच्या प्रचारसभांचे आज तुफानच उसळले होते. विधानसभेवर भगवा फडकणार आणि आपले हक्काचे सरकार येणारच, असा जबरदस्त आत्मविश्वासही उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

काँग्रेस-राष्ट्रवादीला भायखळ्यात खिंडार, काँग्रेसचे माजी नगरसेवक मनोज जामसुतकर शिवसेनेत

‘हे सरकार पाडल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही’ अशी राणा भीमदेवी गर्जना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. होय, खरे आहे! शरद पवारांना सरकार पाडण्याचा दांडगा अनुभव आहे. वसंतदादांचे सरकार पवारांनीच पाडले होते. पण आता हा अनुभव कामी येणार नाही. कारण आमची युती भक्कम आहे असा भीमटोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला.

जालना जिल्हय़ातील घनसावंगी येथे महायुतीचे उमेदवार डॉ. हिकमत उढाण व वैजापूर येथे महायुतीचे उमेदवार प्रा. रमेश बोरनारे यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची दणदणीत सभा झाली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकार पाडण्याच्या केलेल्या वल्गनेचा चांगलाच समाचार घेतला.

माफी मागण्यात गैर काय?

युतीचा धर्म पाळताना निष्ठावंत शिवसैनिकांवर अन्याय झाला. हे सगळे माझे सखेसोबती आहेत. त्यांची माफी मागण्यात गैर काय, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. संभाजीनगर येथे मागे एक नाराज गट उपोषणाला बसला होता. मी गेलो तेथे. गुडघ्यावर बसून मी त्यांचे म्हणणे ऐकले. लगेच दुसऱ्या दिवशी बातमी! उद्धव ठाकरे यांनी नाराजांसमोर गुडघे टेकले. अरे, ही माझीच माणसे आहेत ना! शिवसैनिकांसमोर गुडघेच काय मी डोकेही टेकवेन, त्यात मला काही गैर वाटत नाही. हा समोर पसरलेला अथांग भगवा सागर हीच तर माझी कमाई आहे! तुमच्याशिवाय मी कुणीही नाही, किंबहुना माझे अस्तित्वच नाही असे उद्धव ठाकरे म्हणताच टाळय़ांचा कडकडाट झाला.

काँग्रेसचे टांगा पलटी घोडे फरार!

राष्ट्रीय पक्ष म्हणून ओळखला जाणाऱ्या काँग्रेसचे नेते कुठे आहेत, कार्यकर्ते कुठे आहेत! टांगा पलटी घोडे फरार! चुकून एखादा आमदार निवडून आला तरी तो आपल्याकडेच येणार आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगताच टाळय़ांचा कडकडाट झाला.

दहशतवाद्यांना घुसून मारले, आता घुसखोरांना हाकलणार! – अमित शहा

हीच ती वेळ हिरवा विळखा तोडून टाकण्याची!

लोकसभा निवडणुकीत चूक झाली अन् रझाकार उरावर बसला! संभाजीनगरच काय संपूर्ण मराठवाडय़ालाच हिरव्या नागाने विळखा घातला आहे. पण लक्षात ठेवा, ही संतसज्जनांची भूमी आहे, वीरांची भूमी आहे. इथल्या मातीत शिवसेनाप्रमुखांनी स्वाभिमानाचा अंगार पेरला आहे. या आगीशी खेळाल तर भस्म व्हाल! भगवा उतरवण्याची मस्तवाल भाषा करता, कुणाला दाखवताय मस्ती? तुमच्या सात काय, सात हजार पिढय़ा उतरल्या तरी इथे डौलाने फडकणारा भगवा उतरणार नाही! हीच ती वेळ हिरव्या नागाचा फणा ठेचण्याची, हिरवा विळखा तोडून टाकण्याची असा जबरदस्त घणाघात उद्धव ठाकरे यांनी  संभाजीनगर येथील सभेत केला.

पाकिस्तानला मिठाई कशाला लाथाच घाला!

जम्मू-कश्मीरच्या संदर्भात सरकारने निर्णय घेतला आणि पाकिस्तानला पोटदुखी सुरू झाली. पाकिस्तानची मस्ती काही जिरली नाही. ही मस्ती कुणाला दाखवताय? स्वातंत्र्यदिनाला दोन्ही देश सीमेवर मिठाईचे वाट करतात. यावेळी पाकिस्तानने आपली मिठाई नाकारली. त्यांना मिठाई कशाला देता, लाथाच घाला असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले. या देशातून बांगला घुसखोर हद्दपार झालेच पाहिजेत असे बजावतानाच त्यांनी आमची युती ही हिंदुत्वाचा विचारावर झाली आहे असे स्पष्ट सांगितले. आमचे हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व! राष्ट्रहित! राममंदिराचा विषयही आहेच! मग अशा सगळय़ा परिस्थितीत भाजपबरोबर राहायचे नाही तर कुणाबरोबर! असे उद्धव ठाकरे म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या