चंद्रकांत पाटील यांना ब्राह्मण महासंघाचा पाठिंबा नाही!

1051

कोथरूड विधानसभा मतदार संघातील भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदकार चंद्रकांत पाटील याच्यासह, कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा देणार नसल्याचे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी स्पष्ट केले. तसेच महासंघाचे प्रवक्ते आनंद दवे यांना दिशाभूल केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे.

याबाबत महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष अक्दैत देहाडराय यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे. तसेच चंद्रकांत पाटील यांना दवे यांनी दिलेल्या पाठिंबा पत्राचा व माहासंघाचाही काहीही संबंध नसल्याचेही डॉ.कुलकर्णी यांनी स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे महासंघाचे कोथरूडमधील उमदेवार मयुरेश अरगडे यांनीही दवे यांनी दिलेल्या पाठिंबा पत्राशी आपला काहीही संबंध नसल्याचे सांगून, महासंघाचे पदाधिकारी जो निर्णय घेतील तो मान्य असल्याचे सांगितले आहे. तसेच दवे यांच्या निलबंनामुळे महासंघाला काहीही फरक पडणार नसल्याचेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या