दिव्यांग मतदारांसाठी विशेष व्हेईकल चेअर

विधानसभा निवडणुकीत दिव्यांग मतदारांना मतदानासाठी अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी आता स्पेशल शिडी व्हेईकल सर्व्हीस उपलब्ध करून देण्यात येत आहे. या प्रकारची व्हिलचेअर यंदा प्रथमच उपलब्ध करून दिली आहे.

जमशेद दलाल या कंपनीच्या या स्पेशल शिडी व्हेईकल चेअर आहेत. ही सेवा कंपनीच्या वतीने मोफत देण्यात येणार आहे. मुंबई शहर जिल्ह्यातल्या दहा विधानसभा मतदारसंघातील ज्या मतदान केंद्रावर आवश्यकता आहे अशा ठिकाणी ही सेवा असेल. या सुविधेसाठी

निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर आपले नाव, संपूर्ण पत्ता, विधानसभा मतदारसंघ क्रमांक, यादीतील मतदाराचा अनुक्रमांक नोंदवावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मुंबई शहर शिवाजी जोंधळे यांनी केले आहे.

घरापासून मतदान केंद्रापर्यंत

नोंद झालेल्या मतदारांनाही संपर्क करुन त्यांच्या घरुन मतदान केंद्रापर्यंत ने-आण करण्यात येणार आहे. यासाठी व्ही कॅन संस्थेने पुढाकार घेतला आहे.

टोल फ्री क्रमांक

स्पेशल शिडी व्हेईकल सेवेसाठी 1950 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा किंवा निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर नोंद करावी.

आपली प्रतिक्रिया द्या