शिवशक्ती-भीमशक्तीमुळे सामाजिक एकजूट झाली – आठवले

556

हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवशक्ती-भीमशक्तीच्या एकजुटीचे आवाहन केले होते. त्यानुसार राज्यात शिवशक्ती-भीमशक्तीमुळेच सामाजिक एकजूट झाली. शिवसैनिक जय भीम तर भीमसैनिक जय महाराष्ट्र बोलू लागले, असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले. वांद्र्याच्या खेरवाडीत वांद्रे पूर्व विधानसभेचे महायुतीचे उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.

वांद्रे पूर्वेतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात यावा, अशी येथील आंबेडकरी जनतेची मागणी असल्याचेही आठवले म्हणाले. वांद्रे खेरवाडी येथील सरकारी वसाहतीतील सरकारी कर्मचाऱयांच्या घराकडे, त्यांच्या प्रश्नांकडे सरकार लक्ष देईल, असेही त्यांनी सांगतिले. दरम्यान, शिवरायाची आणि भीमरायाची आण, निवडून आण कमळ आणि धनुष्यबाण अशी कविता सादर करत आठवले यांनी महाडेश्वर यांना निवडून आणण्याचे आवाहनही केले. यावेळी विभागप्रमुख आमदार ऍड. अनिल परब, रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनावणे, जिल्हा अध्यक्ष विवेक पवार, अमित तांबे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या