राहुल गांधी जिथे जातात तिथे पक्ष हरतो! स्मृती इराणी यांचे टीकास्त्र

967

काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे स्वतःच्याच पक्षासाठी एक अडचण बनले आहेत. राहुल गांधी महाराष्ट्रात प्रचाराला येणार आहेत. पण राहुल गांधी जिथे जिथे जातात तिथे त्यांच्या पक्षाला अपयश येते हा आजवरचा इतिहास असल्याचे सांगत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी शुक्रवारी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.

भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी बोलताना स्मृती इराणी म्हणाल्या, लोकसभा निवडणुकीत जसा राहुल गांधी यांना अमेठीत पराभक स्वीकारावा लागला तसा आता विधानसभेतही त्यांना पराभव दिसेल. कारण त्यांच्या पक्षासाठी राहुल गांधी हे अजिबातच सकारात्मक नाहीत. यंदाच्या निवडणुकीत जनता त्यांना अनेक प्रश्न विचारेल. त्यांनी सावरकरांचा अपमान का केला? यामुळे देशाची प्रतिमा मलिन झाली असा आरोपही इराणी यांनी केला.

भाजप सरकारच्या काळात राज्य सुरक्षित

काँग्रेसच्या काळात राज्यात व देशात बॉम्बस्फोटांची जणू आपल्याला सवयच झाली होती, मात्र फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून मुंबई असो की संपूर्ण महाराष्ट्रात एकही बॉम्बस्फोट, दहशतवादी हल्ला झाला नाही की दंगल झाली नाही. फडणवीस सरकारच्या काळात राज्यातील जनतेने सुरक्षित महाराष्ट्र अनुभवला असे म्हणत इराणी यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले.

आपली प्रतिक्रिया द्या