कर्जमुक्तीची दुसरी यादी 28 फेब्रुवारीला

527
प्रातिनिधिक फोटो

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी येत्या 28 फेब्रुवारीला जाहीर होणार असल्याची घोषणा सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी विधान परिषदेत केली.

पहिल्या टप्प्यात 15 हजार 358 शेतकऱयांच्या कर्जखात्याची पहिली यादी घोषित केली आहे. शेतकऱयांची बँक खाती आधारशी लिंक करून त्यात कर्जमाफीचे पैसे जमा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील सुमारे 34 लाख शेतकरी कर्जमुक्ती योजनेपासून शेतकऱयांना कर्जमुक्तीचा लाभ देताना त्यांना हेलपाटे मारायला लागू नयेत, अचूकता यावी हा टप्प्याटप्प्याने याद्या जाहीर करण्याचा उद्देश आहे असे सांगून सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी 28 फेब्रुवारी रोजी दुसरी यादी जाहीर होईल. पहिल्या यादीमध्ये अद्याप तरी त्रुटी असल्याचे निदर्शनास आलेले नाही अशी माहिती त्यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या