ब्रेकिंग – शेतकऱ्यांचा लाँग मार्च स्थगित, शेतकरी नेते जिवा पांडु गावित यांची माहिती

केंद्र सरकारचे जाचक कृषी कायदे रद्द करा, कांद्याला हमीभाव, आदिवासींच्या जमिनी नावावर करा आदी मागण्यांसाठी नाशिकच्या दिंडोरीपासून सुरू झालेला बळीराजाचा लाँग मार्च (Farmers Long March) स्थगित करण्यात आला आहे. शेतकरी नेते जिवा पांडु गावित (Jiva Pandu Gavit) यांनी ही माहिती दिली.

नाशिकच्या दिंडोरीतून 12 मार्च रोजी विविध मागण्यांसाठी भाकप, किसान सभेचा लाँग मार्च सुरू झाला. दहा हजारांहून अधिक शेतकरी, कष्टकऱ्याचे हे मुंबईच्या दिशेने निघाले. माजी आमदार जे. पी. गावीत, डॉ. डी. एल. कराड, अजित नवले आदी या आंदोलनाचे नेतृत्व करीत आहेत.

वन जमिनीच्या प्रमुख प्रलंबित प्रश्नासह शेतमालाला हमीभाव, शेतीसाठी वीज पुरवठा, शेती कर्जमाफी यासह अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशासेविका, शालेय पोषण आहार कर्मचारी, ग्रामपंचायत संगणक परिचालक, ग्रामरोजगार सेवक, पोलीसपाटील यांना शासकीय कर्मचारी म्हणून घोषित करून शासन वेतनश्रेणी लागू करण्याच्या मागणीसाठी भारतीय किसान सभेच्या वतीने लाँग मार्च सुरू करण्यात आला.