शेतकरी कर्जमुक्तीची दुसरी यादी जाहीर!

15610

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्याप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी शनिवार 29 फेब्रुवारीला जाहीर करण्यात आली. महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेसाठी पात्र ठरलेल्या नगर जिल्ह्यातील 2 लाख 52 हजार शेतकर्‍यांची यादी कर्जमाफीच्या पोर्टलवर शनिवारी प्रसिद्ध झाल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी दिली आहे. नगर जिल्ह्यातील या दोन गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाली असल्याने ती गावे यातून वगळण्यात आलेली आहेत.

आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करणाऱ्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती 2019 योजनेची दुसरी यादी शुक्रवारी जाहीर होणार आहे, अशी घोषणा सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी बुधवारी विधान परिषदेत केली होती. दुसऱ्या यादीमध्ये नगर जिल्ह्यातील दोन लाख 52 हजार 483 जणांची नावे आहेत.

नगर जिल्ह्यामध्ये बाबुडी घुमट व विळद या दोन ठिकाणी ग्रामपंचायत निवडणूक होत आहे. त्यामुळे या ठिकाणांची नावे वगळून उर्वरित नावे प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. यादी प्रसिद्ध होताच नावाचे आधार लिंकिंग करण्याचे म्हणजेच नावे प्रमाणित करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यात आलेली आहेत.

वर्धातील 46 हजार 424 शेतकऱ्यांचा समावेश
दुसऱ्या यादीत वर्धा जिल्ह्यातील 46 हजार 424 शेतकऱ्यांचा समावेश आहे. वर्धा जिल्हा प्रशासनाकडून आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. वर्ध्यातील पहिल्या यादीत दोन गावांतील 166 शेतकऱ्यांचा समावेश होता. यापैकी 154 शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत.

… म्हणून मुहूर्त टळला
राज्य सरकारने महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेत प्रयोगिक तत्त्वावर प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावात कर्जमाफी योजनेचे यशस्वी प्रात्याक्षिक घेतल्यानंतर संपूर्ण राज्यात एकाच वेळी 28 फेब्रुवारीला पात्र शेतकर्‍यांच्या याद्या या पोर्टलवर प्रसिध्द करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, राज्यात दीड हजार ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका जाहीर झालेल्या असल्याने आचारसंहितेचे कारण समोर असल्याने कर्जमाफीचा 28 तारखेचा मुहूर्त टळला होता.

पहिली यादी
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी सोमवारी जाहीर करण्यात आली. या पहिल्याच यादीत 15 हजार 358 शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला असून कर्जमुक्तीचे पैसे थेट या शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होत आहेत. सरकारच्या या कर्जमुक्तीने बळीराजा सुखावला असून परभणी जिह्यातील एका शेतकऱ्याने आभार मानताना साहेब, आता कर्जाची चिंता मिटली. लेकीच्या लग्नाला या, असे निमंत्रणच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले.

आपली प्रतिक्रिया द्या