आपल्या आवाजाने चाहत्यांना मंत्रमुग्ध करणारी महाराष्ट्राची लाडकी गायिका आणि अभिनेत्री आर्या आंबेकर हिने नुकताच परदेश दौरा केला असून काही सहकाऱ्यांसह सुट्टीचा आनंद घेतला आहे. तिने नुकतेच गुलाबी रंगाच्या कोटमध्ये Detroit शहरात काढलेले फोटो इंस्टाग्राम पेजवर हटके अंदाजात शेअर केले आहेत. आर्याच्या या फोटोवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स करत तिचे कौतुक केले आहे. झी मराठीच्या ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमातून आर्या घराघरत पोहोचली. यानंतर तिने ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते.