पुरामुळे 39 गावातील 290 कुटुंबातील 1271 नागरिकांचे स्थलांतर

पुरामुळे जिल्ह्यातील 39 गावांमधील 290 कुटुंबातील 1 हजार 271 नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे. नागरिकांचे स्थलांतर करण्यात आलेल्या गावांची संख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. दोडामार्ग तालुक्यातील 7, सावंतवाडी तालुक्यातील 10, वेंगुर्ला तालुक्यातील 1, कुडाळ तालुक्यातील 8, मालवण तालुक्यातील 4, देवगड तालुक्यताील 5 आणि कणकवली शहरातील नागरिकांचे पुरामुळे स्थलांतर करण्यात आले आहे.

 तालुकानिहाय अनुक्रमे स्थलांतरीत कुटुंबाची संख्या आणि व्यक्तींची संख्या पुढीलप्रमाणे – दोडामार्ग एकूण 107 कुटुंबांतील 425 व्यक्ती, सावंतवाडी 84 कुटुंबातील 451, वेंगुर्ला 2 कुटुंबातील 11 व्यक्ती, कुडाळ 72 कुटुंबातील 273 व्यक्ती, मालवण 7 कुटुबांतील 26 व्यक्ती, कणकवली 3 कुटुंबातील 22 व्यक्ती, देवगड 15 कुटुंबातील 63 व्यक्ती, अशा एकूण 290 कुटुंबातील 1271 व्यक्तींचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे.

तालुका निहाय नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक

मुसळधार पावसामुळए उद्भवलेल्या कोणत्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी जिल्हा नियंत्रण कक्ष – 02362- 228847 तसेच टोल फ्री क्रमांक 1077 संपर्क करावा. तसेच तालुका नियंत्रण कक्ष दोडामार्ग – 02363- 256518, सावंतवाडी -02363-272028. वेंगुर्ला – 02366- 262053, कुडाळ – 02362- 222525, मालवण – 02365-252045, कणकवली – 02367 – 232025, देवगड – – 02364- 262204, वैभववाडी – 02367 – 237239 या क्रमांकांवर संपर्क करावा.

आपली प्रतिक्रिया द्या